उनाड वारा साहित्य परिवार आयोजित
नऊ रस काव्य स्पर्धेसाठी
रस – करुण रस
विषय – वृद्धाश्रमातील आई
स्पर्धा दिनांक – १०-११/१०/२०२६
शीर्षक: उंबरठ्यावरची प्रतीक्षा
बालपणी हात धरून
संस्कारांची वाट चालवली,
वृद्धापकाळी माऊलीला
आधाराची ओढ लागली.
लेकरांच्या सुखासाठी
वेदनांना कवटाळले,
त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी
स्वतःचे सुख बाजूला सारले.
कधीकाळी हसऱ्या घराच्या
आठवणी मनात दाटल्या,
वृद्धाश्रमाच्या खिडकीतून
मुलांच्या वाटा न्याहाळल्या.
पावलांची चाहूल लागताच
अंतःकरण अधीर होते,
प्रत्येक अनोळखी चेहऱ्यामध्ये
लेकरांचे प्रतिबिंब शोधते.
सांज सरता अंधार दाटतो,
वृद्धाश्रमात एकटेपण नांदते,
लेकरांच्या अंगणी दीप उजळतात,
माऊलीची आस मात्र जागते.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: ११/१०/२०२६ वेळ: ०९:५४
Post a Comment