अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, मुंबई प्रदेश आयोजित
राष्ट्रीय स्तरावरील भव्य काव्य स्पर्धा
विषय – दुर्गे दुर्गट भारी
काव्यप्रकार – मुक्तछंद
शीर्षक: हुंकार
सिंहवाहिनी, अष्टभुजा,
करुणेचा अथांग सागर,
अन्यायाच्या अंधारात
न्यायाचा तेजस्वी जागर.
महिषासुराच्या अत्याचारांवर,
शौर्याचा घणाघाती वार,
दीनदुबळ्यांच्या संरक्षणासाठी,
मातेची अजिंक्य तलवार.
जिजाऊंच्या स्वप्नात स्वराज्याची पहाट,
सावित्रीबाईंच्या कार्यातून शिक्षणाची वाट,
रणरागिणीच्या शौर्यात निर्भयतेचा साज,
स्त्रीच्या स्वाभिमानात कालीचा आवाज.
चुलीपासून नभांगणापर्यंत,
कर्तृत्वाचा उज्ज्वल विस्तार,
संघर्षांच्या प्रत्येक वळणावर,
जिद्दीचा अजिंक्य हुंकार.
मंदिरातील मूर्तीपलीकडेही
प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गेचा वास,
तिच्या हक्कांचा आदर,
समतेतच समाजाचा खरा विकास.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: ११/१०/२०२६ वेळ: १३:१४
Post a Comment