कविता - ज्योतिबाची कृपाछाया


मोरणा कवी कट्टा समुह सांगली, पश्चिम महाराष्ट्र

राज्यस्तरीय मासिक काव्य लेखन स्पर्धा क्र.१७

स्पर्धा कालावधी:- ०१/०४/२०२६ ते ०२/०४/२०२६

वेळ:- सकाळी १० ते रात्री ११ पर्यंत

विषय:- कुळस्वामी ज्योतिबा..!

काव्य प्रकार:- मुक्तछंद

शीर्षक : ज्योतिबाची कृपाछाया

डोंगरमाथा तेजाळला,
ज्योतिबाचा जय दुमदुमला.
गुलालाचा गंध दरवळला,
भक्तीचा सडा फुलला.

कपाळी उधळलेला गुलाल
श्रद्धेने लाल झळाळला,
दर्शनाच्या त्या क्षणी
जीव आनंदाने न्हाऊन निघाला.

घंटानादाच्या तालावर
भक्तीचा झरा झंकारला,
कुळस्वामीच्या चरणी
सुखाची सावली विसावला.

कृपादृष्टीच्या वर्षावाने
जीवनपथ उजळला,
दुःखाच्या काळ्या ढगांना
आशेचा किरण भिडला.

दीनांच्या हाकेला धावणारा
तो करुणामूर्ती दयाळा,
शौर्य, माया, संरक्षण
यांचा अखंड कृपाज्वाला.

जयघोषांच्या नभात
श्रद्धेचा नाद दुमदुमला,
कुळस्वामी ज्योतिबाच्या स्मरणे
मनमंदिर पुन्हा फुलला.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०२/०४/२०२६ वेळ : २१:५१



*मोरणा कवी कट्टा* समूह सांगली पश्चिम महाराष्ट्र

 *दिनांक १/४/२६ ते* *२/४/२०२६, राज्यस्तरीय काव्य* *लेखन स्पर्धा* 

 *विषय: कोल्हापूर कुळस्वामी* *श्री.ज्योतिबा..!* 

 *स्पर्धा क्रमांक.१७*


 *निकाल पत्रक* 


*सर्वोत्कृष्ट क्रमांक..*

सन्मा.गुरुदत्त दिनकर वाकदेकर,मुंबई.

 

*उत्कृष्ट क्रमांक*


सन्मा.शोभा कोठावदे,मुंबई


*प्रथम क्रमांक*


सन्मा.रसिका आनंद शाळिग्राम,पुणे.


*द्वितीय क्रमांक*

सन्मा.वाणी वेणूमाधव केरकलमट्टी,डोंबिवली..


*तृतीय क्रमांक*

सन्मा.मंगेश मनोहर रेडीज,घाटिवळे, रत्नागिरी 


*उत्तेजनार्थ*

सन्मा. भारती कुलकर्णी,नौपाडा,ठाणे


*परीक्षक*

कविराज

विजय यशवंत सातपुते,पुणे.


प्रशासकीय समिती..*

प्रशासकीय मंडळ:२०२६


मोरणा कवी कट्टा समूह सांगली पश्चिममहाराष्ट्र 


मोरणा कार्यकारणी/प्रशासकिय समिती २०२६/२७


मा.संजय वसंत माने,

संस्थापक/उपाध्यक्ष 


१.प्रदेश अध्यक्ष


.सन्मा.विजय सातपुते,पुणे


२.समुह अध्यक्ष:


.सौ.अनिता गुजर, (हिरकणी) डोंबिवली


३कार्याध्यक्ष 


सन्मा.सुभाष कासार,नवी मुंबई 


४.समुह समन्वयक:


सौ.संगीता राजपूत,कल्याण ठाणे.


५.कार्यवाह:


सन्मा.मनोहर वाळींबे.अंबरनाथ


६.समुह प्रशासक


सन्मा.श्रद्धा शिंदगीकर,वारजे,पुणे.


कार्यकारणी सदस्या 


७.प्रा. मन्नाडे रमा धनराज, लातूर 


८.सन्मा.दीप्ती कुलकर्णी,कोल्हापूर 


कार्यकारणी सदस्य 

९.सन्मा.हर्षवर्धन दीक्षित, छ. संभाजी नगर

१०सन्मा.महादेव हवालदार,शिराळा

११.सन्मा.विलास बाबर,पुणे

कार्यकारणी सदस्या 

१२.सन्मा. अस्मिता इनामदार,सांगली.

Post a Comment

Previous Post Next Post