कविता - धम्मक्रांतीची ज्योत


अक्षरवर्स पब्लिकेशन, बार्शी

विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजित

भीम विचारांचे मोती भव्य काव्यलेखन स्पर्धा २०२६

स्पर्धा कालावधी: २७ मार्च २०२६ ते २ एप्रिल २०२६
(सात दिवसीय स्पर्धा)

विषय: धम्मक्रांती

शीर्षक: धम्मक्रांतीची ज्योत

अंधारलेल्या युगाला
प्रज्ञेचा दीप लाभला,
मूक वेदनांच्या ओठांना
स्वाभिमानाचा नाद सापडला.

अन्यायाच्या राखेतून
नवा मानव उमलला,
समानतेच्या शांत वाटेवर
बंधुभाव दरवळला.

करुणेच्या स्पर्शातून
मनामनांत सेतू विणले,
शिक्षणाच्या किरणांनी
दास्याचे ढग पांगले.

बाबासाहेबांच्या धम्मातून
मानवतेला दिशा लाभली,
संविधानाच्या ओव्यांतून
नवभारताची चाहूल लागली.

ही क्रांती रक्ताची नव्हे,
अंतरीच्या प्रकाशाची लाली,
स्वातंत्र्य-बंधुतेच्या उषःकाली
माणुसकी नव्याने बहरली.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०२/०४/२०२६ वेळ : १८:१८

Post a Comment

Previous Post Next Post