कविता - ज्ञानदीपाचा वारसा


शिका • संघटित व्हा • संघर्ष करा!

सुगत फाउंडेशन ट्रस्ट
आयोजित
भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त
भव्य काव्यलेखन स्पर्धा २०२६

स्पर्धा कालावधी
०५ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२६
(एकूण कालावधी – ७ दिवस)

स्पर्धेचा विषय: डॉ. बाबासाहेब आंबेडकर : विचार आणि वारसा

शीर्षक : ज्ञानदीपाचा वारसा

शिक्षणाचा मंत्र दीप
तमाला भेदणारा,
संघटनेचा जागृत स्वर
हातांना दिशा देणारा.

लढत झुंजत जीवनदीप
अंतरी प्रज्वलित झाला,
समतेच्या उषःकालाने
अन्यायाचा अंधार संपला.

भुकेल्या नयनांमध्ये
विद्येचे नभ दाटले,
मूक अधरांवर जनतेचे
स्वाभिमानगीत उमटले.

जातीभिंतीसमोर ठाकले
वज्राहुनी कठीण निर्धार,
माणुसकीच्या मिठीत
बंधुतेचा एकच आधार.

राखेतून उमलून येथे
यशकमळ सुवासित झाले,
बाबासाहेबांच्या विचारातून
नवयुगाचे क्षितिज खुलले.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: ११/०४/२०२६ वेळ: ०४:३२

Post a Comment

Previous Post Next Post