कविता गीत –भोळा शिवशंकरा
भोळा शिवशंकरा, नमो नमः,
करुणा सागरां, नमो नमः ।
भावाचा देवरा, नमो नमः,
श्रद्धेच्या आधारां, नमो नमः ॥ध्रु॥
श्रावण सरींनी धुतला गाभारा,
फुलांनी सजला आज देव्हारा ।
भोळ्या भावाने वाहून तुळस,
नयनात भरतो शिव शंकरा ॥१॥
जटेत गंगा, चंद्र कपाळा,
वृषभारूढ आला महाकाळा ।
भक्तीरसात आसमंत दुमदुमला,
मंत्रोच्चाराने जीव उजळला ॥२॥
डमरूचा निनाद, भस्माचा सुवास,
नेत्रात तेज, हृदयात निवास ।
शिवरूप पाहत भरते ओंजळ,
भक्तीच्या दीपांचा तोच प्रकाश ॥३॥
उमा सहचर, प्रेमात रमतो,
गणराया शोभतो तेज मुकुटात ।
सौंदर्य, करुणा, शक्ती अन् शांती,
शिवत्व भरतो भोळा जिवनात ॥४॥
सोमवार आला, विशेष दिन,
अभिषेक करतां शांतीचा धागा ।
दूध, जल, बेल, अर्पिताच,
शिवनाम घेता होई जागा ॥५॥
नीलकंठ झाला, हलाहल प्याला,
त्रिशूल हातात, रुद्र तांडव घुमला ।
ॐ नमः शिवाय जपता अखंड,
शिवनामात ब्रम्हांड गुंजला ॥६॥
श्वासोश्वासात शिवाची ओळख,
नमः शिवायात ममतेची रेषा ।
सात पिढ्यांचा आधार होतो,
पावन वाटते त्याचीच दिशा ॥७॥
भोळा शिवशंकरा, नमो नमः,
करुणा सागरां, नमो नमः ।
भावाचा देवरा, नमो नमः,
श्रद्धेच्या आधारां, नमो नमः ॥ध्रु॥
समारोप गजर
हर हर महादेव जपुनी पाहा,
शिवनाम सदा मनी रुजवा ।
ओंजळ भरा भक्तिभावाची,
शांतीचा दीप अंतरी पेटवा ॥
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०४/०८/२०२५ वेळ : ०३:३३
Post a Comment