कविता - "आवाजातुन उभं राहिलेलं विश्व"
(Acharya 90FM – तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त)
मंदशब्दांचा आनंददायी स्वर –
"Acharya 90FM" चा अपूर्व झरा,
शब्दांना मिळालेलं व्यासपीठ,
हाच प्रत्येक मनाचा आनंद खरा…
“Your Own Radio” –
म्हणजे विचारांचं मुक्त आकाश,
जिथे तरंगतात
शिक्षण, संवेदना आणि संस्कारांचे सूर.
इथे मनातल्या प्रश्नांना,
गवसतात आशेची उत्तरं.
इथे श्रोते फक्त ऐकत नाहीत –
ते सहजच जोडले जातात.
मनामनांत एक अदृश्य धागा विणत
हे माध्यम होतं सशक्त संवादाचं साधन.
या तरंगांना जीवंत ठेवत,
मनात झंकार निर्माण करत
RJ तेजस्विनी आणि RJ कोमल –
कधी मृदु, कधी गंभीर,
कधी माहितीपूर्ण, कधी हलक्या मजेशीर –
पण कायम अंतःकरणाशी थेट संवाद साधतात.
तिसऱ्या वर्षाचं हे यशस्वी पाऊल
एका समर्पणाचं बिंब आहे –
CTES चा आधार,
आचार्य मराठे कॉलेजची धडक,
सुबोध आचार्य यांचं तळमळीचं कार्य,
आणि अनेकांची लाभलेली साथ…
ज्यांचे शब्द झाले शस्त्र,
आणि तरंग झाली शक्ती.
या सर्वांनी मिळून
‘रेडिओ’ ला केलं
एक सजीव स्पंदन.
हा ‘रेडिओ’ केवळ गाणी वाजवत नाही –
हे आहे लोकांचं मन ऐकणारं,
शिक्षण देणारं,
संवेदनांचं चक्र फिरवणारं माध्यम.
आज, काळही थांबून ऐकतोय –
कारण विचारांनी भरलेल्या या तरंगांना
काळाचंही वंदन आहे.
शब्दांचा हा अजेय अश्वमेध
जितका ऐकताना गूंजतो,
तितकाच अंतर्मनात लक्ष्यवेधी ठरतो.
आज तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला
काव्याचं वंदन!
ज्यांनी आवाज दिला –
त्यांच्या निनादांना
हजारोंची दाद!
वृद्धिंगत होवो हे संवादस्वरूप स्वप्न,
गुंजो तुमच्यामुळे विचारांचा तेजस्वी मंत्र!
"Acharya 90FM" –
शब्दांच्या तरंगांनी
संवादाच्या नवशब्दांमध्ये
पुढील अनेक यशोगाथा लिहोत!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १२/०७/२०२५ वेळ : ०६:१२
Post a Comment