कविता - बंध विश्वासाचे

कविता - बंध विश्वासाचे
 
चला सारे हात धरू, 
एकमेकांचे आधार होऊ, 
माणुसकीच्या ओलाव्याने, 
स्पंदनांचे गीत गाऊ!
 
प्रेमसागरात सूर मारू,
सावल्यांना ऊब देऊ, 
मेघ भरून बरसताना, 
त्या थेंबांचे सुख होऊ!
 
नाते आपले सन्मानाचे, 
विश्वासाच्या वीणीत गुंफले, 
मनगंधी स्पर्शांनी सजले, 
स्वप्नांतही जे कधी न तुटले!
 
जिथे करुणेचा सुरेल दरवळ, 
तिथे स्नेहाची सुगंधी चाहूल, 
दुःख पेलू हसऱ्या डोळ्यांनी, 
साथ लाभली प्रेमाची अनमोल!
 
आपुलकीची ओढ जपू, 
आयुष्यभर नाते फुलवू, 
चला उजळू हृदयांगण, 
अन् बंध विश्वासाचे सजवू!

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : २८/०३/२०२५ वेळ : १०:०३

Post a Comment

Previous Post Next Post