कविता - बोल ना...
मोकळेपणाने बोल ना,
मनात काही दडवू नको।
शब्द तुझे मज ठाम हवेत,
अर्धवट काही बोलू नको॥
प्रेम जर माझं अधुरं वाटतं,
तर मुक्तपणे दूर हो ना।
तिथेच जा, जिथे सुख तुझे,
माझ्या भावनांना झुलवू नको ना॥
शपथ तुला या नात्याची,
ना चालेल हे फक्त अटींवर!
माझ्याविना कुणी ह्रदयापासी,
तर विसर हे स्वप्न आयुष्यभर!
हसणं तुझं माझ्यासाठी,
जगभर ते तू वाटू नको,
प्रेमाच्या नाजूक धाग्यांना,
गैरसमजात गुंतवू नको।
नातं असतं विश्वासाचं,
त्याला हवी एक रेषा खरी,
तूच ठरव, माझं व्हायचं,
की कापायची नशिबाची दोरी?
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक ०४/०३/२०२५ वेळ : १८:५४
Post a Comment