कविता - स्मृतींचा सुगंध
हसऱ्या दिवसांचे चांदणेही हसते,
क्षण सरताही सुगंध दरवळतो।
सुगंधित वाऱ्याला मनही मोहवते,
आठवांची सरिता हृदयी सांडतो॥
कधी हसू, कधी अश्रू ढाळत,
हळुवार स्पर्शून जाते हर एक लाट।
गोड आठवांची गाणी गात,
मनाच्या किनाऱ्यावर स्वप्नांचा थाट॥
दुःखाचे वादळ जेव्हा घोंगावते,
शब्दांपलीकडले बोल जुळतात।
भूतकाळाचा दीप तेजाळत जातो,
आशेच्या किरणांत स्वप्ने खुलतात॥
उजळतो तिमिरात सोनेरी दिवा,
स्मृतींचा सुगंध हलकेच अलवार।
मोहक त्या क्षणांचा सुगंध नवा,
हळुवार फुंकर घालतो जखमांवर॥
हृदयातली हीच तर संपत्ती,
न्हालेली स्वप्नांच्या मोहक गंधात।
हा श्वास वाऱ्याचा सुगंधी,
स्वर निनादले आनंद संगीतात॥
© गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १७/०२/२०२५ वेळ ०३:०६
Post a Comment