३१ जानेवारीपासून वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी तळघरातील पूजेचा अधिकार व्यास कुटुंबाला दिला, तेव्हापासून एका समाजाचे लोक सतत खोटे सांगून गोंधळ पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. वाराणसी जिल्हा न्यायालयाने नवीन काही केलेले नाही. डिसेंबर १९९३ पर्यंत व्यास कुटुंब ज्ञानवापी येथील मंदिराच्या तळघरात पूजा करत होते. औरंगजेबाच्या आदेशानुसार मंदिर पाडण्यापूर्वी सुमारे १२५ वर्षांपासून व्यास कुटुंब याच तळघरात पूजा करत आहे. ज्यांना यात काही वाटत असेल त्यांनी एकदा जाऊन मंदिरांची व्यवस्था समजून घ्यावी.
मंदिरात अर्चक आणि पुजारी यांचे क्षेत्र आणि दिवस विभागले गेले आहेत. जर एखादा अर्चक मंदिराच्या एका भागात किंवा विशिष्ट दिवशी पूजा करतो, तर दुसरा अर्चक किंवा पुजारी दुसऱ्या भागात किंवा दुसऱ्या दिवशी पूजा करतो. मंदिराचा तो भाग किंवा तो दिवस त्या अर्चकाच्या नावावर राहतो. यासाठी कोणताही लेखी आदेश जारी करण्यात आलेला नाही. पण हा क्रम वंशपरंपरेने पिढ्यानपिढ्या चालू आहे. त्या तळघरावर १५५१ पासून व्यास कुटुंबाचाही हक्क आहे.
औरंगजेबाच्या आदेशानुसार १६६९ मध्ये एप्रिल ते जुलै दरम्यान ज्ञानवापी मंदिर पाडल्यानंतरही, व्यास कुटुंबाने तळघरात पूजा करण्याच्या हक्कासाठी लढा सुरूच ठेवला. १८९१ मध्ये बनारसमध्ये हिंदू-मुस्लिम वाद शिगेला पोहोचला तेव्हा ब्रिटिशांच्या काळात त्यांना हा अधिकार पुन्हा मिळाला. त्यावेळी हा वाद शांत करण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हिंदूंना तळघरात आणि पश्चिमेकडील भिंतीवर, तर मुस्लिमांना जमिनीवर नमाज अदा करण्याचा अधिकार दिला. त्यानंतर पुन्हा वाद झाला नाही.
डिसेंबर १९९३ मध्ये मुलायमसिंह यादव यांनी कोणत्याही लेखी आदेशाशिवाय व्यास यांचे तळघर एकतर्फी बंद केले आणि तेथे ठेवलेल्या मूर्ती काढून घेतल्याने वाद पुन्हा निर्माण झाला. तेव्हापासून व्यास कुटुंब न्यायालयात त्यांच्यासाठी राखीव असलेल्या तळघरासाठी कायदेशीर लढाई लढत असून, त्यास जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी मंजुरी दिली. परंतु असे असतानाही, जबाबदार मुस्लिम उलेमांकडून मुद्दाम खोटे पसरवले जात आहे की, "न्यायालयाच्या आदेशानुसार तेथे मूर्ती जबरदस्तीने ठेवल्या गेल्या."
साहजिकच, त्यांच्या या खोट्या वक्तव्याने हिंदूंच्या बाजूने उद्रेक तर निर्माण होईलच पण मुस्लिमांना असा संदेश जाईल की, हिंदू त्यांच्या मशिदीवर जबरदस्तीने कब्जा करत आहेत. त्यामुळे दोन समाजात द्वेष निर्माण होईल जो समाजाच्या शांततेला मारक ठरेल. हे मुस्लिम उलेमा, ज्यात केवळ मशिदीच्या व्यवस्था समितीचे लोकच नाहीत तर बरेलवी आणि देवबंदी पंथाचे मौलाना आणि मुफ्ती यांचाही समावेश आहे, ते जाणीवपूर्वक अपप्रचार करत आहेत. कधी ते म्हणतात की, तिथे मंदिर नव्हते तर कधी ते म्हणतात की, औरंगजेबाने हिंदू स्त्रियांच्या आग्रहास्तव ते मंदिर पाडले होते. कधी ते तिथे मंदिर नसून बौद्ध मठ असल्याचा युक्तिवाद करतात, तर कधी ते म्हणतात की, ज्या हिंदूंनी धर्मांतरण केले त्यांनी स्वतःच मंदिर पाडून त्याचे मशिदीत रूपांतर केले. बरेलवी पंथाचे ज्येष्ठ मौलाना तौकीर रझा यांनी एक नवीन खोटे रचले आहे आणि म्हटले आहे की, हिंदूंनी स्वतः मंदिर पाडले आणि तेथे मशीद बांधली कारण त्यांनी इस्लामचा स्वीकार केला होता. तौकीर रझा म्हणतात की, जर मुस्लिमांनी मंदिर पाडले असते तर त्यांनी हिंदू मंदिराच्या खुणा का सोडल्या असत्या? तौकीर रझासारखे मौलाना जेव्हा असे खोटे निर्माण करतात, तेव्हा ते हे विसरतात की, एक खोटे अनेक प्रश्नांना जन्म देते. उदाहरणार्थ, तौकीर रझा यांचे खोटे सत्य म्हणून मान्य केले तर त्याचा अर्थ असा होतो की, नंदीच्या समोरचे शिवलिंग ज्याला ते झरा म्हणत होते ते खरोखर शिवलिंग आहे. तसेच मशिदीची पश्चिमेकडील भिंत ही मंदिराची भिंत असून त्यासाठी कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नसल्याची ओरड होत आहे. तरीही मुस्लिम अभ्यासकांकडून केवळ एएसआयच्या सर्वेक्षणाला चुकीचे म्हटले जात नाही तर न्यायालयही सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचे बोलले जात आहे.
याचा अर्थ असा आहे की, जे या मुफ्ती आणि मौलाना यांच्या खोट्या प्रचारावर विश्वास ठेवत नाहीत ते त्यांच्या दृष्टीने चुकीचे आहेत. मग ते देवबंदी मौलाना अब्दुल कासिम नोमानी असोत किंवा जुनागडचे मुफ्ती सलमान अजहरी असोत. सुन्नी इस्लाममधील प्रत्येक पंथाचे मौलाना केवळ ज्ञानवापीबद्दल खोटे बोलत आहेत आणि स्वतःच्या समाजाला हिंदूंविरुद्ध भडकवत आहेत. मुस्लिमांवर खूप अन्याय होत आहे, त्यामुळे त्यांनी ‘लढायला’ तयार राहावे, असा संदेश यातून दिला जात आहे. हे करताना मुफ्ती असोत वा मौलाना, ते सर्व प्रकारचे असत्य बोलत आहेत. या समाजाची समस्या अशी आहे की, मुस्लिम त्यांच्या उलेमा, मुफ्ती किंवा मौलानांवर आंधळा विश्वास ठेवतात. ते जे काही बोलतात, ते मुस्लिम समाज कान बंद करून ऐकतोच, पण कोणत्याही प्रश्नाशिवाय सत्य म्हणून स्वीकारतो. त्यामुळेच न्यायालयाच्या आदेशानंतर शुक्रवारी ज्ञानवापी परिसरामध्ये जमा झालेली गर्दी किंवा जुनागढच्या मौलानाच्या अटकेनंतर मुंबईत जमा झालेली गर्दी. हा समुदाय आपले मौलाना जे बोलतात तेच बरोबर असल्याचे मानतो आणि हेच मौलाना द्वेष पसरविण्यापासून आणि असत्य बोलण्यापासून परावृत्त होत नाहीत.
असं करताना ते केवळ इतिहासच खोटा ठरवत नाहीत तर, कित्येकवेळा इस्लामिक तत्त्वांचाही विपर्यास करतात. म्हणूनच मंदिरे पाडणे किंवा मूर्ती नष्ट करणे हे इस्लाममध्ये न्याय्य आहे पण मौलाना जाहीरपणे खोटे बोलतात की मंदिर पाडून मशीद बांधताच येणार नाही. जर असे असेल, तर औरंगजेबाने गादीवर बसताच १६६८ मध्ये काशी, मुलतान आणि थट्टा येथील मंदिरांतील ब्राह्मण (कुफ्र की तालीम) "अविश्वासाची शिकवण" देत असल्याचे कारण देत मंदिरे पाडण्याचे आदेश का जारी केले होते?
औरंगजेबाच्या दरबारी इतिहासकार शकी मुस्तैद खान यांनी 'मासिर-ए-आलमगिरी'मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, औरंगजेब आलमगीरने या तिन्ही ठिकाणची, विशेषतः काशीतील मंदिरे पाडण्याचे आदेश दिले होते. हे केल्यामुळेच औरंगजेबाला मुस्लिमांमध्ये आलमगीरचा दर्जा मिळाला, कारण तो खरा इस्लाम प्रस्थापित करण्याचे काम करत होता, ज्यामध्ये मंदिर आणि मूर्तींच्या रूपात कुफ्र आणि शिर्कला स्थान नव्हते. औरंगजेबाने केवळ ज्ञानवापी मंदिरच पाडले नाही तर गंगेच्या काठी असलेले बिंदू माधव मंदिरही पाडून तेथे मशीद बांधली, जी मंदिराच्या अवशेषांवर आजही उभी आहे. मुस्लिम त्याला धरहरा मशीद म्हणतात. बाकी मंदिराच्या अवशेषांबद्दल सांगायचे तर त्यामागचे कारण वेगळे होते. बनारस विश्वविद्यालयामधील इतिहासाचे प्राध्यापक राजीव श्रीवास्तव म्हणतात की "१६६९ मध्ये ज्ञानवापी मंदिर पाडण्यासाठी औरंगजेबाने स्थानिक सुभेदार अबुल हसन यांना बनारसमध्ये नवीन मंदिरे बांधली जाऊ नयेत आणि खूप महत्त्वाची मंदिरे पाडली जावीत याची खात्री करण्याचे आदेश दिले होते." प्रोफेसर श्रीवास्तव पुढे सांगतात की "ज्ञानवापी येथील आदि विश्वेश्वर मंदिर पाडण्यासाठी सुभेदार अबुल हसनने ५० हत्ती आणि शेकडो मजूर कामाला लावले होते. तरीही ते संपूर्ण मंदिर पाडू शकले नाहीत.अबुल हसनला हे काम लवकरात लवकर पूर्ण करून औरंगजेबाला माहिती पाठवायची होती, म्हणून त्यांनी ४५ दिवसांत जे काही मंदिर तोडले ते पाडून त्यावर मशिदीचा घुमट बांधला. त्यामुळेच ज्ञानवापी येथे बांधलेली मशीद मंदिराच्या भिंती आणि खांबांवरच उभी आहे."
मुस्लिम समाजाला इतिहास आणि इस्लामची योग्य माहिती देण्याची जबाबदारी देशभरातील मुस्लिम मौलानांची आहे. त्यांच्या खोट्या विधानांनी न्यायालयाच्या निर्णयात काही फरक पडणार नाही, की ज्ञानवापीचं सत्य तळघरात बंदिस्त होणार नाही. असे केल्याने ते फक्त मुस्लिमांची दिशाभूल करतील आणि हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवतील. त्यांनी असत्याच्या आधारावर केलेली शांततेची चर्चा विफल ठरली की जे सत्य सामोरे येईल त्याच्या उत्तरदायित्वाची जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही याच मौलानांना घ्यावी लागेल. त्यानंतर मुस्लिम समाजाला ते कसे सामोरे जातील याचा देखील त्यांनी विचार करावा.
Post a Comment