सुवर्णक्षण
१.९.२०२३
निरांजन अनमोल
क्षण आला औक्षणाचा
भावा बहिणीचा खास
मनी राहो सदा माया
फक्त असे हीच आस
नाही सोस दागिन्यांचा
नसे वस्तूंचीही हाव
राहो वदनी सुहास्य
त्यास कोहिनूरी भाव
रंक असो किंवा राव
नाते बंधाचे जाणतो
ज्याचे मनगट सुने
नित्य आसवे ढाळतो
जरी इवलासा धागा
त्यात ताकत विश्वाची
करी जीवाचे रक्षण
अशा अनोख्या शक्तीची
सण राखीपौर्णिमेचा
त्यास नाही दुजे मोल
तव नयनांच्या ज्योती
निरांजन अनमोल
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर.
मुंबई, महाराष्ट्र
दिनांक : ३०/०८/२०२३ वेळ : ०६:१२
Post a Comment