कविता - एक पत्र




सुवर्णक्षण 
३.८.२०२३

एक पत्र

हस्ताक्षर भाषाशैली 
परिच्छेद एक पत्र
भावनांचा आविष्कार 
जपणारा खरा मित्र

छाप उमटते त्यात
लेखकाच्या प्रतिभेची
काळालाही मागे नेई
छटा ऐसी प्रतिमेची

उलगडे अलवार
नात्यातील भावबंध
शब्द शब्द दृढ करी
क्षणांमध्ये अनुबंध

एक पत्र लिंकनचं
जगभर गाजलेलं
नेहरूंच्या इंदिराला
बापासम भेटलेलं

हरवलं एक पत्र
असं माझ्या माऊलीचं
कोडं सुटेना जगाचं
अन् माझ्या जगण्याचं

- गुरुदत्त दिनकर वाकदेकर,
मुंबई, महाराष्ट्र.
दिनांक : ०३/०८/२०२३ वेळ : ०५३१

Post a Comment

Previous Post Next Post