कविता – निष्ठेची मशाल
प्रभाग दोनशे सहाच्या मातीवर
उगवली विश्वासाची पहाट,
लोकमनातून तेजाळली
अविरत निष्ठेची वाट.
पावलांनी दारोदारी
उलगडली जीवनकथा,
भविष्याच्या ओझ्याखाली
दडलेली एकच व्यथा.
कामगारांच्या संघर्षाचे
येथे कोरलेले लेख,
त्या रेषांतून उभा राहिला
अढळ न्यायाचा पवित्र आलेख.
आरोग्याच्या प्रश्नांमध्ये
माणुसकी मिसळली,
स्वच्छतेच्या प्रवासात
कृतीची मशाल धरली.
मातेच्या डोळ्यांत दिसली
शाश्वत सुरक्षिततेची रेषा,
तरुणांच्या स्वप्नांना मिळाली
भविष्यासाठी नवी दिशा.
सत्तेची आकांक्षा नव्हे
सेवेशी जुळलेली प्रतिज्ञा,
सचिन पडवळ यांच्यापुढे
कोणाचीच काय प्रज्ञा.
शिवसैनिकांनी पांघरली
शिवबंधनाची शाल,
ठाकरेंच्या विचारांची पुन्हा
तेजस्वी प्रज्वलित मशाल.
हा क्षण फक्त यशाचा नाही
साक्ष जिवंत निष्ठेची,
शिवडी, लालबाग, परळ
आजही ठाकरेंच्याच श्वासांची.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १७/०१/२०२६ वेळ : १७:४६
Post a Comment