कविता – माणुसकीची पायवाट
प्रभाग दोनशे पाचमध्ये
फुलली नवी पहाट,
घोषणांआड न दडलेली
माणुसकीची पायवाट।
गल्लीबोळांत फिरताना
उलगडले वेदनेचे पदर,
व्यथा ऐकताना,
उमटला सेवेचा सूर।
झोपड्यांच्या छपरांतून
उमटला बदलाचा नाद,
वसाहतींच्या उंबरठ्यावर,
फुलली आपुलकीची साद।
सत्ता नव्हे, येथे
जगण्याशी जोडलेली कास,
दैनंदिन प्रश्नांसाठी
वाहिला प्रामाणिक श्वास।
पाण्याच्या थेंबांत
वाचली टंचाईची कथा,
रस्त्यांच्या भगदाडांत
दिसली विकासाची गाथा।
स्वच्छतेच्या शोधयात्रेत
जागी झाली जबाबदारी,
आरोग्याच्या अपेक्षेत
चेतली सजग तयारी।
स्त्रीच्या नजरेत
उजळली सुरक्षिततेची रेषा,
तरुणांसाठी नवनिर्माण,
झाली भविष्याची दिशा।
सुप्रिया दळवी —
संघर्षातून घडलेले नाव,
लोकविश्वासाच्या मुळांवर
उभा सेवाभावाचा भाव।
इंजिन या चिन्हातून
धावली परिवर्तनाची गती,
न थांबणारी लोकयात्रा —
भविष्याची उज्ज्वल प्रचिती।
हा केवळ विजय नव्हे,
आशेची अखंड यात्रा,
जनतेच्या वेदनांवरची
विश्वासाची जीवनमात्रा।
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १७/०१/२०२६ वेळ : ०८:१०
Post a Comment