कविता – विश्वास


कविता – विश्वास

संजय नाना आंबोले नाव मनात कोरले,
अनुभवाच्या प्रवासात विश्वासदीप उजळले।

दाट वस्तीतून उमटली कर्मनिष्ठ रेषा,
घोषणांहून अधिक प्रभावी ठरली कृतीची दिशा।

रस्त्यांच्या खाचांतून खुल्या झाल्या वाटा,
अडथळ्यांच्या गर्दीत सापडला धैर्याचा साठा।

जलटंचाईच्या लाटांवर सजगतेची जाणीव,
निवेदनांच्या ओघात उमटले उत्तर सजीव।

स्वच्छतेच्या संघर्षात शिस्तीचा आविष्कार,
अस्वच्छतेच्या अंधारावर कर्तव्याचा प्रहार।

पथदिव्यांच्या उजेडात निर्धाररेषेची ओळ,
भीतीच्या सावल्यांवर आशेचा स्पष्ट बोल।

नारी सन्मानाच्या भूमीवर उभी छाया संरक्षणाची,
युवक स्वप्नांच्या आकाशी फुलली संधी शक्यतांची।

ज्येष्ठांच्या वाटचालीस लाभला सन्मानाचा आधार,
असहाय क्षणांत चमकला सहकार्याचा हातभार।

मतगणनेत सेवाभावाचा ठसा गहिरा उमटला,
कार्याच्या सातत्यात आजही जिवंत तो वसा राहिला।

जय–पराजय आकड्यांचे क्षणिक पडसाद ठरले,
मूल्यांच्या पायावर विश्वासाचे महाल उभे राहिले।

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १८/०१/२०२६ वेळ : ०९:००

Post a Comment

Previous Post Next Post