कविता – दीपशिखा
लोकशाहीच्या प्रांगणात रोवली गेली आशा,
मतपेटीतून जन्मली जनभावनेची भाषा।
सेवेच्या सुगंधाने सजले निष्ठेचे तोरण,
दोनशे नऊच्या भूमीवर केले काळाने लेखन।
यामिनी जाधव — ओळख नव्हे, तो संस्कार,
कृतिशीलतेतून उमटले मूल्यांचे उच्चार।
प्रगती, करुणा, सहवेदना यांचा सुरेल मेळ,
लोकहिताच्या प्रवाहात अखंड वाहणारा खेळ।
पालिकेच्या पायऱ्यांपासून सभागृहाच्या काठावर,
सत्तेपेक्षा माणुसकी ठेवली अग्रक्रमावर।
संकटांच्या रात्रीत जेव्हा भीती झाली दाट,
तेव्हा धैर्याची ज्योत बनली सेवाभावी वाट।
उपचारांनी शमवली वेदना, स्नेहाने जागवली उमेद,
कर्तव्याच्या कसोटीवर कोरले नेतृत्वाचे वेद।
या प्रवासात लाभले मार्गदर्शन यशवंतांचे,
भक्कम संरक्षण, अनुभव, पाठबळ, संयमाचे।
हा जल्लोष नाही, हा शांत संमतीचा सूर,
लोकहृदयातून उमटलेला निर्धाराचा पूर।
उंच शिखर नव्हे, सेवाभावाची तेजस्वी शिखा,
ही जनतेच्या प्रेमातून पेटलेली दीपशिखा।
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १६/०१/२०२६ वेळ : २०:१६
Post a Comment