कविता – तितिक्षेचा दीप


कविता – तितिक्षेचा दीप

तितिक्षा…
हा फक्त शब्द नाही,
तर काळजाच्या कोंदणात प्रज्वलित झालेला
एक शांत, स्थिर, प्रकाशमय दीप —
वादळांनी कितीही झोडपलं तरी, 
न विझणारा, न ढळणारा.

तितिक्षा म्हणजे
सहनशीलतेचा अंतर्मुख, गूढ प्रवाह—
ज्यात दुःख दगडांप्रमाणे खाली बसतात,
आणि त्या दगडांच्या पायघड्यांवरच
हळूहळू उभा राहतो
जगण्याचा मजबूत तट,

तितिक्षा सांगते
स्वप्नांच्या राखेतून
नि:शब्द उमलणारा कोवळा अंकुर;
ज्याला ठाऊक असतं—
आजचं सावट केवळ क्षणभंगुर आहे,
आणि उद्या नवा सूर्योदय होणार आहे.

तितिक्षा दर्शवते
निखाऱ्यांवर चालतानाही
आतली नदी जपणारी
एक अद्भुत, अविचल संयमशक्ती;
दुःखाच्या काठावर उभं राहूनही
विश्वासाच्या ज्योतीला
कधीही न डळमळू देणारी.

तितिक्षा उभी राहते…
उंबरठा ओलांडताना
वेदनांच्या पावलांवर
फुलांचं निःशब्द कवच उमलणं;
लढाई जिंकण्यासाठी नाही,
तर स्वतःला न हरवण्यासाठी
प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्षाला
स्वीकारण्याची मनाची तयारी.

तितिक्षा असते—
मनाला देहापेक्षा विशाल बनवणारी
एक मौन तपश्चर्या;
आणि आत्म्याला कणाकणाने
स्वावलंबन शिकवणारी
अदृश्य, पण अखंड साथ देणारी गुरुशक्ती.

तितिक्षा असते म्हणूनच
आपण उद्याच्या दिशेने चालत राहतो—
घाव सहन करतो, परंतु झुकत नाही;
अडथळे उभे राहतात, तरीही
आपलं आकाश आपणच
दरवेळी नवं, स्वच्छ,
निरभ्र करत राहतो.

तितिक्षा एवढंच सांगते—
“दुःख सहन करून जगायचं नसतं;
दुःखातूनच प्रकाश शोधत
स्वतःचा नवा जन्म घ्यायचा असतो.”

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १०/१२/२०२५ वेळ : ०२:३४




तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांनी आयोजित केलेल्या दोन स्वतंत्र स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना

तितिक्षा परिवाराचे मनःपूर्वक आभार 🙏🙂

प्रियाताई दामले, विजय सातपुते, सुजित कदम, विलास बाबर सर, श्रद्धा ताई शिंदगीकर, संजय माने सर त्याचबरोबर परिवारात जोडलेले सगळे सारस्वत बंधू-भगिनी यांचे मनःपूर्वक आभार आपलं सहकार्य यापुढे देखील असेच लाभत राहू दे ही नम्र विनंती 🙏🙂


*तितिक्षा (प्रासंगिक) काव्यलेखन*


सर्वोत्कृष्ट


 १) श्रद्धा सिंदगीकर ( संस्कृत)



२) शरदचंद्र काकडे 

३) गुरूदत्त वाकदेकर.

४) मनोहर वाळींबे

५) रामकृष्ण कामत


उत्कृष्ट


६) शोभा धामस्कर

७) श्रीगणेश शेंडे

८) वंदना धर्माधिकारी

९) भारती कुलकर्णी



सर्वोत्तम


१०) विजय सातपुते

११) सुजित कदम

१२) विलास बाबर

१३) सुरेश शेठ

१४) गोविंद कुलकर्णी




उत्तम


१५) रविंद्र गाडगीळ

१६) मानसी पाटील

१७)स्वाती दिवाण

१८) दीपाराणी गोसावी



तितिक्षा (अध्यात्मिक )

काव्यलेखन *


सर्वोत्कृष्ट..*


१९) नीता नहार

२०) ज्योती हमीने

२१) अरूण गांगल

२२) मंगेश‌ कवटीकवार



*सर्वोत्तम*


२३) उज्वला सहस्त्रबुद्धे

२४) स्वाती मोदी

२५) नीला चित्रे

२६) अंजली डोळे


उत्कृष्ट

२७) अलका भवारी

२८) अरूंधती वैद्य

२९) शिवाजी उराडे

३०) डाॅ. दक्षा पंडीत.


उत्तम


३१) स्मिता भीमनवार

३२) रंजना भोईटे

३३) पद्मनाभ हिंगे

३४) रसिका शाळीग्राम.

Post a Comment

Previous Post Next Post