कविता – प्रकाशाचा शोध – भारत
भारत…
जो युगानुयुगे
प्रकाश पसरवत आला आहे—
तो फक्त नकाशावरचा भूभाग नाही,
तर मनात धीटपणे उभा राहणारा
आशेचा, शांततेचा
मार्गदर्शक दीप आहे.
भारत म्हणजे—
काळोखातूनही वाट काढणारी
जिद्द आणि संयमाची अदम्य शक्ती.
दुःख दगडांसारखे रचले गेले
तरी त्याच दगडांवर
नव्याने उभं राहतं
एकतेचं, विश्वासाचं
भक्कम पाऊलवाट बांधणार सामर्थ्य.
भारत म्हणजे—
ऋषींच्या मनातून उगम पावलेला
ज्ञानाचा निर्मळ झरा;
वेद—उपनिषदांच्या शब्दांमधून
युगायुगांतून प्रवाहित होत
आजही अंतःकरणात
आशेचं संगीत झंकारत राहतं.
भारत म्हणजे—
करुणेचा अंतर्मुख प्रवाह;
जिथे ताकदीपेक्षा समजूत मोठी,
तर विजयापेक्षा
सहजीवनाचा प्रवास श्रेष्ठ.
इथे माणुसकीला मुकुट नसतो,
पण प्रत्येक हृदयात
सिंहासनासारखी उभी असते
समत्वाची दिव्य भावना.
भारत म्हणजे—
थकलेल्या पावलाला आधार देणारी
हळुवार, अदृश्य शक्ती;
इतिहासाच्या काळवंडलेल्या पानांतूनही
नव्या पहाटेचा सोनेरी स्पर्श
पुन्हा जागृत करणारी जिद्द.
एक दिवा मंद झाला तरी
दुसरा स्वतः पेट घेत
अंधाराची लढणारी जागरूकता.
भारत म्हणजे—
मनातली दिवाळी,
जिथे प्रत्येक माणूस
एक छोटा दिवा;
थोडासा उजेड देऊनही
अंधारावर राज्य करणारा.
भारत एवढंच शिकवतो—
“प्रकाशाचा शोध कधी थांबवू नका.
श्रद्धेची एक ठिणगीसुद्धा
संपूर्ण जग उजळवण्याची ताकद ठेवते.”
भारत म्हणजे—
आत्मशोधाचा अथांग, शांत समुद्र;
जो कोलाहलात नव्हे,
तर आकाशाच्या निळाईतून
आपल्याशी संवाद साधतो.
तो हळुवार सांगतो—
“उजेड बाहेर नसतो,
तो मनातल्या सत्यातून
हळूहळू उमलत जातो.”
आणि म्हणूनच—
युगानुयुगे चिरंतन प्रकाशाच्या शोधात
निखळ समर्पित असलेला भारत
आजही आपल्या श्वासांत,
आपल्या नजरेत
कोवळ्या पहाटेसारखा
शांतपणे फुलत राहतो.
भारताचा खरा संदेश एवढाच—
“मार्क कधी भरकटला तरी चालेल,
पण प्रकाशावरचा विश्वास,
कधी गमावू नका.”
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: १०/१२/२०२५ वेळ : १०:४४
Post a Comment