कविता – पाण्यात उतरलेला डोंगर


साखळी चित्रकाव्यलेखन स्पर्धा – तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे

चित्र क्रमांक : २

दिनांक : १९/१२/२०२५

शीर्षक : पाण्यात उतरलेला डोंगर

काव्यप्रकार : मुक्तछंद

डोंगरांच्या कुशीत विसावलेले हे पाणी
आकाशाचे प्रतिबिंब हळूच मनात उतरवते.
ढग सावकाश सरकतात,
जणू वेळ इथे थांबून श्वास घेत आहे.

काठावर पसरलेली कोरडी माती
कधीकाळच्या ओलाव्याच्या आठवणी जपते,
आणि तलाव
मौनातूनही आपली कथा सांगत राहतो.

डोंगररांगांमधली ही शांतता
आवाजरहित, पण अर्थांनी भरलेली,
थकलेल्या मनाला
इथेच स्वतःकडे परत यावंसं वाटतं.

पाणी काहीच मागत नाही,
तरी ते जीवन देत राहतं,
जसं तितिक्षा—
सहनशीलतेतूनच आशेची बीजं पेरतं.

या अथांग निळेपणात उमगतं,
थांबणं म्हणजे हार मानणं नव्हे,
तर पुन्हा उभं राहण्यासाठी
स्वतःला सावरण्याची ही शांत तयारी आहे.

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १९/१२/२०२५ वेळ : ०७:४७


*तितिक्षा  भावार्थ सेवांतर्गत  तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित निःशुल्क साखळी चित्रकाव्यलेखन  स्पर्धा.* 

 संपूर्ण साखळी चित्रकाव्यलेखन  
प्राविण्य निहाय विजेते 

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

 *तीन दिवसीय चित्रकाव्यलेखन प्राविण्य निहाय  सर्वोत्कृष्ट* 

 *मा. गुरुदत्त वाकदेकर* 

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

 *तीन दिवसीय चित्रकाव्यलेखन* 
 *प्राविण्य निहाय उत्कृष्ट* 

*मा. रामकृष्ण कामत*

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

 *तीन दिवसीय चित्रकाव्यलेखन* 
 *प्राविण्य निहाय प्रथम क्रमांक* 

*मा. विजय यशवंत सातपुते,पुणे*

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

 *तीन दिवसीय चित्रकाव्यलेखन* *प्राविण्य निहाय  द्वितीय क्रमांक* 

 *मा. सुजित शिवाजी कदम* 
*मा. सुरेश शेठ*

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

 *तीन दिवसीय चित्रकाव्यलेखन* *प्राविण्य निहाय तृतीय क्रमांक* 

 *मा.पद्मनाभ हिंगे* 
*‌मा.श्रावणी सूळ*
*‌मा.ज्योती कुलकर्णी*

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

 *तीन दिवसीय चित्रकाव्यलेखन*** *प्राविण्य निहाय उत्तेजनार्थ* 

 *मा. संध्या बनसोडे.* 
 *मा. नीता काळी.* 

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

 *चित्रकाव्य साखळी स्पर्धा* 
 *विषय निहाय विजेते* 

 *फेरी क्रमांक १* 
 *१८/१२/२०२५* 

 *सर्वोत्कृष्ट क्रमांक* 

*मा. डाॅ. मृदुला कुलकर्णी*

💢💢💢💢💢💢💢

 *उत्कृष्ट क्रमांक* 

*मा. राधा गर्दे*

💢💢💢💢💢💢💢

 *प्रथम क्रमांक* 

*मा. मीनाक्षी शिलवंत*

💢💢💢💢💢💢💢

 *द्वितीय क्रमांक* 

*मा. शुभांगी हवालदार*

💢💢💢💢💢💢💢

 *तृतीय क्रमांक* 

*मा. जयदीप वैद्य*

💢💢💢💢💢💢💢

 *उत्तेजनार्थ क्रमांक* 

१)  *मा. सुरेंद्र पाटील*
२)  *मा. कविता लोखंडे*

💢💢💢💢💢💢💢

 *फेरी क्रमांक २* 
 *१९/१२/२०२५* 

 *सर्वोत्कृष्ट क्रमांक* 

*मा.  पद्मनाभ हिंगे*

💢💢💢💢💢💢💢

 *उत्कृष्ट क्रमांक* 

*मा. नंदा सावंत*

💢💢💢💢💢💢💢

 *प्रथम क्रमांक* 

*मा. श्रद्धा सिंदगीकर*

💢💢💢💢💢💢💢

 *द्वितीय क्रमांक* 

*मा. रविंद्र गाडगीळ*

💢💢💢💢💢💢💢

 *तृतीय क्रमांक* 

*मा. डाॅ. मानसी पाटील*

💢💢💢💢💢💢💢

 *उत्तेजनार्थ क्रमांक* 
१)  *मा. चंद्रभूषण किल्लेदार*
२)  *मा. संजय माने*

💢💢💢💢💢💢💢
 *फेरी क्रमांक ३* 
 *२०/१२/२०२५* 

💢💢💢💢💢💢💢

 *सर्वोत्कृष्ट क्रमांक* 

*मा.  मोहन देशपांडे*

💢💢💢💢💢💢💢

 *उत्कृष्ट क्रमांक* 

*मा. गोविंद कुलकर्णी*

💢💢💢💢💢💢💢

 *प्रथम क्रमांक* 

*मा. विलास बाबर*

💢💢💢💢💢💢💢

 *द्वितीय क्रमांक* 

*मा. डाॅ. स्मिता‌ मुकणे*

💢💢💢💢💢💢💢

 *तृतीय क्रमांक* 

*मा. ज्योती हमीने*

💢💢💢💢💢💢💢

 *उत्तेजनार्थ क्रमांक* 

 १)  *मा.  स्मिता भीमनवार*.

२)  *मा. भारती‌ कुलकर्णी*

💢💢💢💢💢💢💢
प्राविण्य निहाय विजेते 
१०
विषय निहाय विजेते
२१
--------------------------------------
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन.

तितिक्षा इंटरनॅशनल पुणे.


तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांनी आयोजित केलेल्या दोन स्वतंत्र स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना

तितिक्षा परिवाराचे मनःपूर्वक आभार 🙏🙂

प्रियाताई दामले, विजय सातपुते, सुजित कदम, विलास बाबर सर, श्रद्धा ताई शिंदगीकर, संजय माने सर त्याचबरोबर परिवारात जोडलेले सगळे सारस्वत बंधू-भगिनी यांचे मनःपूर्वक आभार आपलं सहकार्य यापुढे देखील असेच लाभत राहू दे ही नम्र विनंती 🙏🙂

Post a Comment

Previous Post Next Post