साखळी चित्रकाव्यलेखन स्पर्धा – तितिक्षा इंटरनॅशनल, पुणे
चित्र क्रमांक : १
दिनांक : १८/१२/२०२५
शीर्षक : तांडव
काव्यप्रकार : मुक्तछंद
मेघांच्या गर्भात आकार घेणारे तांडव–
गर्जना भयाची नव्हे, अंतर्मन जागवणारी आहे.
भाळावर शांत भालचंद्र,
अंतःकरणात विश्वाचा ज्वलंत प्रश्न.
डमरूच्या नादब्रह्मात थरथरते सृष्टी,
अग्नीस्पर्शात वितळून जातो अहंकार,
त्रिशूळ रोखतो काळ
असत्याच्या छातीवर.
हे नृत्य विध्वंसाचे नाही,
हा नवसर्जनाचा संस्कार आहे,
कारण मावळणं नाकारलं
तर उगवणंच अपूर्ण राहते.
एक पाऊल अज्ञानाचा अंधार चिरडणारे,
दुसरे करुणेच्या प्रकाशात विसावलेले,
दुःख सहन करत
मानवतेकडे नेणारे तितिक्षेचे तांडव.
स्वतःवर विजय मिळेपर्यंत
तांडव अपूर्णच राहते,
तेव्हाच संयम, करुणा आणि सत्य
यांना गवसते मुक्तीची वाट.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १८/१२/२०२५ वेळ : १३:३२
Post a Comment