चारोळी – दुर्गा देवीच्या नऊ रूपांवर प्रत्येकी एक चारोळी....


*माझी लेखणी साहित्य मंच, आयोजित..*

📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝

*नवरात्रोत्सव माझी लेखणीचा...*

🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️

*दिवस- चौथा.....*

📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝

*उपक्रम दि. २५ सप्टेंबर २०२५*

📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝

*विषय - दुर्गा देवीच्या नऊ रूपांवर प्रत्येकी एक चारोळी....*

(एक रूपावर एक चारोळी म्हणजेच एकूण 9 चारोळ्या)

📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝

*वेळ- सकाळी ७ ते रात्री ११:३० वाजेपर्यंत...*

📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝

*१. शैलपुत्री*

शैलपुत्री तेजोमयी,
संध्याकिरण उगवते।
शुभ्रवर्णा दैवी माता,
फुलगंध उधळते॥

🌹🌹🌹🌹

*२. ब्रह्मचारिणी*

तपस्विनी साधना,
सागर लाट वाहते।
संयमयुक्त तेजस्विनी,
भक्तांना सदा पाहते॥

🌹🌹🌹🌹

*३. चंद्रघंटा*

चंद्रकोर उजळते नभ,
घंटानाद घनघन।
सिंहारूढी रणरागिणी,
रक्षितसे रात्रंदिन॥

🌹🌹🌹🌹

*४. कूष्मांडा*

सृष्टीजननी स्नेहमयी,
सूर्यकिरण चमकते।
फलदात्री संपत्तिसंपन्न,
वनरम्यते झळकते॥

🌹🌹🌹🌹

*५. स्कंदमाता*

स्कंदमाता धरती,
मातृस्नेह जोपासते।
करुणामयी भक्तांवर,
आशीर्वाद उधळते॥

🌹🌹🌹🌹

*६. कात्यायनी*

महिषासुर संहारिणी,
शस्त्रधारी उभी राहते।
धर्मसंरक्षक वीरांगना,
भक्तांवर कृपा वाहते॥

🌹🌹🌹🌹

*७. कालरात्रि*

भीषणरूपा कालरात्रि,
असुरांना भय दाखवते।
भयदायी तेजस्विनी,
भक्तांची आशा वाढवते॥

🌹🌹🌹🌹

*८. महागौरी*

शुभ्रवर्णा करुणामयी,
सुखशांती वाहते।
पापताप हरपणारी,
भक्तां सदा जपते॥

🌹🌹🌹🌹

*९. सिद्धिदात्री*

करी भक्त स्वप्न साकार,
शक्तिमयी अधिष्ठात्री।
कृपा जीवन उद्धारी,
योगशक्ती सिद्धीदात्री॥

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक :२५/०९/२०२५ वेळ : २३:०४

Post a Comment

Previous Post Next Post