संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५०व्या जन्मोत्सवानिमित्त
श्री संत सावता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेसाठी
विषय: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज
शीर्षक: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर
जय जय ज्ञानेश्वर,
जय जय माऊली।।ध्रु।।
जन्म झाला ओवीमधुनी,
आळंदी ज्ञानदीपाने उजळली।
अलौकिक संपत्ती जगा लाभली,
कोवळ्या वयात प्रज्ञा बहरली।।
अल्पकाळी जीवनदीप तरी,
गीतेचे गूढ सहज उलगडले।
ओघवत्या वाणी रस बरसला,
शब्दामृत अंतरी दरवळले।।
मर्त्यदेह विलीन अनंता,
भक्तिरस अंतरी ओथंबला।
विश्वात्म्याची गाठ घडविली,
जनतेचा धर्मदीप उजळविला।।
श्वासामध्ये देव वसती,
ज्ञानेश्वर सांगती सत्य।
भक्तिप्रेम प्रकाश अखंड,
विश्व हेच घर दैवी नित्य।।
वारकरी परंपरा सुगंधी,
संतपरंपरेचा अंकुर।
ज्ञानोबा-तुकाराम संगे,
गुंजे मंजुळ मंगलस्वर।।
देई सुखशांती जनतेला,
तेजोमय ज्ञानयोगी माऊली।
भक्तिप्रेम प्रकाश स्मृती,
जगती ज्ञानदीप लावली।।
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक: २०/०८/२०२५ वेळ: १३:५०
Post a Comment