संगमनेर साहित्य परिषद आयोजित भव्य काव्यलेखन स्पर्धेसाठी
❇️ दिनांक :- १० ऑगस्ट २०२५
❇️ वार :- रविवार
❇️ वेळ:- सकाळी १० ते रात्री १०
❇️ विषय:- गाणे स्वातंत्र्याचे
❇️ शीर्षक:- स्वातंत्र्यमंत्र
उगवली प्रभात, किरणांत न्हाली,
सुवर्ण स्वप्नांनी माती उजळली,
शतकांच्या जखमा पुसुनी हसली,
गाई वसुंधरा—"मी मुक्त झाली!"
रक्तरंगात उमलली प्रभा तेजोमय,
त्याग, बलिदान, लढ्यांची सभा,
कैदखान्याच्या भिंती फोडुनी,
एकच स्वातंत्र्यमंत्र गुंजला नभा.
वाऱ्याच्या श्वासात सुगंध दरवळ,
भुयारी पत्रकांचा स्वर गुंजला,
ढोलाच्या ठेक्यावर चाल ठाम होती,
सत्याग्रहींच्या डोळ्यांत दीप उजळला.
हे गीत धैर्याच्या हृदयाचा ताल,
भाकर वाटणाऱ्या हातांचा जाळ,
झुकणार नाही अशी मान ज्याची,
त्यास अर्पण स्वातंत्र्याची अमर माळ.
आजही आभाळी तिरंगा डुलतो,
हजारो स्वप्नांना मोत्यात गुंफतो,
स्वातंत्र्य राखण्याचा हाच मूलमंत्र,
प्रेम, समता, बंधुता फुलवणं सांगतो.
चला गाऊ या स्वर उंचावुनी,
नव्या भारताची गाथा सजवुनी,
जिथे न्याय-प्रेम हेच राष्ट्रगीत,
मानवतेचा सागर नांदो एकवटुनी.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १०/०८/२०२५ वेळ : १०:०८
Post a Comment