Poem - Our Words Are Magnet
Our words are magnet—silent steel,
Drawing hearts that dare to feel.
Unshed tears and dreams long gone,
Are summoned back with syllables drawn.
In every whisper, thunder hides,
In every pause, the truth abides.
Letters lean, then fuse and glow—
A spark that only souls can know.
Our words are compass, flame, and thread,
They stitch the wounds we never said.
Through fractured time, they bend and mend,
A single line can make or end.
But oh—how words can also fray,
Repel the kindest hearts away.
A cruel phrase, once set in flight,
Can haunt the calmest mind at night.
They drift through space, unseen but strong,
In lullaby, protest, prayer, and song.
They pull the lost, the brave, the scarred—
And leave the deepest silence charred.
One letter I once meant to send—
Unread, became the story’s end.
What if I’d dared to let it speak?
Would strength have bloomed from something weak?
Our words are magnet—fierce and fine,
They carve in air a sacred sign.
So speak with grace, or not at all—
For what we say can rise or fall.
What if silence says too much,
And sound itself is out of touch?
Can truth exist in wordless form—
Or must it brave the spoken storm?
In echoes still, they find their place—
A language spun from stardust lace.
What starts as sound becomes the key—
Unlocking hearts, and setting free.
So guard each word before it’s cast—
Some build forever, some won’t last.
©Gurudatta Dinkar Wakdekar, Mumbai
Date : 08/07/2025 Time : 08:01
माझ्याच मुळ इंग्रजी कवितेचं मराठी भाषांतर
"आपले शब्द – एक चुंबक"
“आपले शब्द… एक चुंबक असतात.”
कधी हळूवार ओढणारे,
कधी हृदयाला थेट भिडणारे.
आपण बोलतो तेवढंच महत्त्वाचं नाही...
...कधी कधी, आपण न बोललेलंही बोलतं.
आपले शब्द – एक शांत चुंबक,
हृदयाच्या संवेदनांना नकळत ओढतात.
विसरलेली स्वप्नं उतरतात आसवांत,
शब्दांच्या ध्वनीत परत जिवंत होतात क्षणं.
प्रत्येक कुजबुजीच्या मागे दडतो एखादा गडगडाट,
आणि शांततेच्या अंतरात असतो खरा आत्मार्थ.
अक्षरं एकमेकांकडे झुकतात, एकमेकांशी जुळतात –
तेव्हा मनाच्या पटलावर उजळतो एक गूढ शब्द.
आपले शब्द – दिशा दाखवणारे, आशेचा उजेड,
आणि जोडणारा धागा.
तेच सांधतात न बोललेल्या जखमा,
त्याचवेळी… एक वाक्य – सावरू शकतं...
...किंवा मोडूनही टाकू शकतं.
पण शब्द... फाडूनही टाकतात.
कधी अतिशय जवळचेही दूर जातात.
हवेत उडवलेलं एक उर्मट वाक्य –
रात्रीच्या शांततेतही छळतं मनात खोलवर…
शब्द फिरतात अवकाशात – अदृश्य पण जिवंत.
बाळाच्या अंगाईत, संताच्या अभंगात,
सैनिकाच्या घोषणेत,
आणि कुठल्याशा प्रार्थनेतही.
ते ओढतात हरवलेले, झुंजार आणि तुटलेले.
आणि कधी...
मौनालाही पेटवतात – अग्निकुंडासारखं.
एक पत्र मी लिहिलं होतं...
पण पाठवलंच नाही.
त्या अपूर्ण शब्दांनीच गोष्ट अर्धवट राहिली.
ते शब्द बोलले असते, तर...?
कदाचित, दुर्बलतेला मिळाली असती नवी ताकद.
आपले शब्द – धारदार पण नाजूक,
हवेतील ओळीत कोरतात एक पवित्र चिन्ह.
म्हणून बोलताना शब्द जपूनच वापरावेत –
कारण ते उंचही नेतात…
...आणि खोलही पाडतात.
पण...
कधी मौनही खूप काही बोलून जातं.
आणि शब्दच... अर्थहीन वाटतात.
खरं, न बोलता उमजतं का?
की मग तेच मौन उघडतं
अंतःकरणातल्या वादळाचं कवच?
प्रतिध्वनींमध्येही तेच शब्द परत येतात,
जणू कोणीतरी जपलेली
एखादी तारकांच्याही पलीकडची भाषा.
एक साधा उच्चारही उघडू शकतो...
बंद दरवाजे… आणि मोकळा करू शकतो आत्मा.
म्हणून...
शब्द उच्चारण्याआधी थोडं थांबा –
काही शब्द जखमांवर फुंकर घालतात,
आणि काही...
नात्यांना कायमचं मोडून टाकतात.
कारण शब्द… हे फक्त ध्वनी नाहीत...
ते आपल्यामध्ये दडलेले चुंबक असतात.
*©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०८/०७/२०२५ वेळ : ०८:४६
Post a Comment