तितिक्षा महाकाव्य लेखन करंडक स्पर्धा २०२५
तितिक्षा भावार्थ सेवा संस्था अंतर्गत", "तितिक्षा इंटरनॅशनल पुणे" व "सोल्युशन माईंड" आणि "भारतीय विचारधारा"" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तितिक्षा महाकाव्य लेखन करंडक स्पर्धा २०२५ स्पर्धेसाठी
फेरी क्रमांक : १
विषय : माझा गुरू
शीर्षक: माझा गुरू
काय सांगावे? शब्द अपुरे,
प्रेरणांचा अथांग सागर।
"माझा गुरू" नाव उच्चारता,
नयनांतून झरतो निर्झर॥
सावलीसारखे लाभले गुरू,
शब्दांत त्यांच्या बळ उमगते।
ज्ञानस्वरूप त्या अस्तित्वात
मनशांती स्थिर निवासते॥
वाट हरवता हात मिळावा,
संशयाचा अंधार हरपावा।
स्मरण होताच त्या चेहऱ्याचे,
विचारांतून नवा दीप उजळावा॥
नजरेत शंका साठता,
संयमाचे सूर झंकारती।
भीतीच्या भोवऱ्यात थांबता,
अंतरी स्पंदने फुलती॥
वाटेवरी त्या हरवलेल्या,
अंधाराला आव्हान देतो।
मौनातून मिळते दिशा,
जो माझ्या श्वासांत पेटतो॥
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ११/०७/२०२५ वेळ : २३:३१
Post a Comment