स्पर्धेसाठी
शब्दसेतू साहित्य मंच, पुणे
आणि
मोरणा कवीकट्टा समूह, पश्चिम महाराष्ट्र
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
पश्चिम महाराष्ट्र काव्य करंडक काव्यलेखन स्पर्धा २०२५
फेरी क्रमांक : ३
विषय : माझी कविता (अभंग)
शीर्षक : अनाहत
शब्दांची सावली ।
मनात दाटते ॥
स्पंदन विणते ।
अनुबंध ॥१॥
अश्रूंच्या धारांची ।
साखळी रचली ॥
हाकही घुमली ।
अंतर्मनी ॥२॥
श्वासांत जपली ।
पालवी स्मृतीची ॥
नवचैतन्याची ।
संजीवनी ॥३॥
भावधारांतून ।
जीवन वाहते ॥
सत्यात सजते ।
काव्यधारा ॥४॥
माझी काव्यरेषा ।
दीप झळकते ॥
तिमीर भेदते ।
प्रभाज्योत ॥५॥
संवाद साधते ।
हळवे छेडते ॥
अंतरी नांदते ।
शांततेत ॥६॥
जन्मून उठते ।
क्षणांत विरते ॥
पुन्हा उमटते ।
अनाहत ॥७॥
@गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०८/०६/२०२५ वेळ : १२:५५
विषय : माझी कविता (अभंग)
शीर्षक : अनाहत
शब्दांची सावली ।
मनात दाटते ॥
स्पंदन विणते ।
अनुबंध ॥१॥
स्वप्नवत फुलं ।
धाग्यांत गुंफली ॥
कविता फुलली ।
सर्जनात ॥२॥
अश्रूंच्या धारांची ।
साखळी रचली ॥
हाकही घुमली ।
अंतर्मनी ॥३॥
श्वासांत जपली ।
पालवी स्मृतीची ॥
नवचैतन्याची ।
संजीवनी ॥४॥
उरात धरते ।
शुद्धतेची वाट ॥
स्वरभाषा थाट ।
आचरण ॥५॥
भावधारांतून ।
जीवन वाहते ।॥
सत्यात सजते ।
काव्यधारा ॥६॥
वाचताना तिला ।
ह्रदयात ठेव ॥
ओसंडते भाव ।
सुवासिक ॥७॥
माझी काव्यरेषा ।
दीप झळकते ॥
तिमीर भेदते ।
प्रभाज्योत ॥८॥
प्रकाश टिपते ।
गंधात भिजते ॥
दर्पण धरते ।
प्रतिबिंब ॥९॥
संवाद साधते ।
हळवे छेडते ॥
अंतरी नांदते ।
शांततेत ॥१०॥
सूरात न्हाऊन ।
चेतना खुलते ॥
छंदात गुंफते ।
शारदेला ॥११॥
जपून ठेवते ।
दिशा दाखवते ॥
मनी ठसवते ।
सरस्वती ॥१२॥
जन्मून उठते ।
क्षणांत विरते ॥
पुन्हा उमटते ।
अनाहत ॥१३॥
@गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०७/०६/२०२५ वेळ : १०:३५
Post a Comment