तुझ्या नजरेत भिजला, मंद सुगंध वारा,
ओठांवर साखर, हसू गोडशेरा.
तुला पाहताच हळूच हसू येतं,
चहासारखं मन, उकळतच राहतं!
प्रेमाचा चहा, दाट दाट झालाय,
तुझ्या आठवणींचा स्वाद त्यात आलाय.
दूध, साखर, मसाला विसरू कसा?
तुझ्या गोड बोलण्यातच त्यांचा ठसा!
वाफेच्या मिठीत, तुझी आठवण न्यारी,
चहा कपात रोज, नशा गोड भारी.
कधी आल्यासारखं तुझं बोलणं वाटतं,
तर कधी गवती चहा मऊच लागतं!
प्रेमाचा चहा, दाट दाट झालाय,
तुझ्या आठवणींचा स्वाद त्यात आलाय...
संध्याकाळच्या पावसात, गरम घोट प्यावा,
तुझ्या मिठीत अलगद, जीव हरवावा.
चहा आणि तु, परफेक्ट जोड आहे,
प्रेमाच्या रंगात, स्वप्न फुलत आहे!
प्रेमाचा चहा, तुझ्या हातून हवा,
तुझ्या मिठीतच त्याचा खरा आस्वाद हवा! ❤️☕
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०८/०३/२०२५ वेळ : ०४:०४
Post a Comment