कविता - ग्रेट राणी जगताची



पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

ग्रेट राणी जगताची


माळव्याचा तेजसूर्य

चौंडी गावी उगवला

होळकर घराण्याचा

झेंडा जगी फडकला


न्यायप्रेमी सत्यप्रेमी

सुशासन हाच धर्म

करे शिव आराधना

रणांगण हेच कर्म


अंगणात दोन फुले 

मालेराव मुक्ताबाई

पती सासर्‍यांनंतर

झाली रयतेची आई


हिंदूधर्म रक्षणार्थ 

दाखविले शौर्य भान

जनतेच्या ह्रदयात

सदा आदराचे स्थान

 

तुम्ही हरलात तर

काय असणार गत

दिले राघोबा उत्तर

पेशव्यांस दिली मात


कॅथरीन मार्गारेट

झाली तुलना तिघींची 

देवी अहिल्या ठरल्या

ग्रेट राणी जगताची


©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई

दिनांक : २३/०५/२०२४ वेळ : ०५२७

Post a Comment

Previous Post Next Post