कविता - कर हक्काचा सन्मान

कोण कुठूनही येतं

मतं मागत फिरतं

पाच वर्षांत परत

तोंड दिसत नसतं


कोणी दाखवतं निष्ठा

कोणी करतं गद्दारी

चिंन्हांसाठी करतात

दिवसाढवळ्या चोरी


बाप दुसर्‍याचा कोणी

आपलाच म्हणवतो

पोरं दुसर्‍याची कोणी

तिसराच मिरवतो


निती धर्म बुडव्यांना

चला अद्दल घडवा

मतदान अधिकार

चला सार्‍यांनी बजावा


शुद्धी बुद्धीत राहून

चला करा मतदान 

मतदार राजा आता

कर हक्काचा सन्मान 


©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई

दिनांक : १८/०५/२०२४ वेळ : ०१४९

Post a Comment

Previous Post Next Post