कविता - निपचित


झगमग प्रकाशात चमकणारे रंगलेले चेहरे 
अंधाराच्या कुशीत डोकं लपवून
कितीतरी वेळ रडतात
मरण दिवसेंदिवस सोपं होत जातं
काही चेहरे 
नालायक लोकांच्या समूहासारखे कमी होत जातात
बळीराजा म्हणजे 
एक ढेकूळ फोडणारा शेअर बाजाराचा बैल 
शेतकऱ्यांच्या हाडात शिंगं घुसवतो
बाजाराच्या मंदीत खताचा वेग निरर्थक ठरतो
शेतकरी आयुष्यभर कष्ट करून  कमावतो
फक्त एक मजबूत फास
जो बांधला जातो गळ्याभोवती 
आणि आशेच्या त्या झाडावरून
आयुष्याची आणखी एक साखळी तुटते
फासळ्यांमध्ये धडधडणाऱ्या चिमुकल्या ह्रदयातून 
रिक्तता पसरते 
दिवसभराचा वेग रात्रीसवे विरघळतो 
प्रत्येक आशा धुळीप्रमाणे उधळली जाते 
निपचित पडलेला तो मात्र
सावलीलाही पोरका होतो

©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 
दिनांक : ०३/०२/२०२४ वेळ १८०४

Post a Comment

Previous Post Next Post