कविता - स्वर्गाहूनही सुंदर


चांगल्या लोकांमध्ये राहायला 

मलाही खूप आवडते

जिथे चांगल्या वागण्याची परतफेड 

फक्त चांगुलपणानेच केली जाते


अशा समाजाची स्वप्ने मी पाहतो

जी चांगुलपणा दुप्पट करतील

जगासाठी असे उदाहरण होतील

अन् सार्‍यांच्या स्मरणात राहातील 


पण नकळत मी ओढला जातो

कृतघ्न लोकांच्या टोळक्यात

इतके आहेत ते काटेरी की

जवळ जाताच जखमी करतात


निवडुंगाच्या वर्तनाने होती जखमा

तरी त्या काट्यांचे भलेच चिंतितो

दगडालाही पाझर फुटावा

अशी आशा कायम मनात ठेवितो


वाळवंटही स्वीकारेल पराभव

माझ्या अथक प्रयत्नां समोर

ओसाड माळावरही फुलवेन 

बाग मी स्वर्गाहूनही सुंदर


©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई 

दिनांक : १०/०२/२०२४ वेळ १८२२

Post a Comment

Previous Post Next Post