आपल्या कर्मचाऱ्यांच्या पहिल्या विमान प्रवासाचा अनुभव प्रायोजित करणारी कंपनी : आरडीसी काँक्रीट



कॉर्पोरेट जगत
सुवर्णक्षण
११.९.२०२३
    कर्मचार्‍यांचे वाढदिवस साजरे करणे आणि कंपनीत वर्षपूर्ती निमित्त फुले पाठवणे या काही सोप्या गोष्टी आहेत ज्या बहुतेक कंपन्या करतात. पण कायमस्वरूपी आठवण करून देण्यासाठी कर्मचार्‍यांचा अनुभव तयार करणे ही अशी गोष्ट आहे ज्यासाठी शुद्ध हेतू आणि सामूहिक विचारांची आवश्यकता आहे.

आरडीसी काँक्रीट ही आघाडीची रेडी मिक्स्ड कॉंक्रिट (आरएमसी) कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशीच एक आजीवन स्मृती तयार करत आहे. आपल्या 'मेरी पहली उडान' उपक्रमाद्वारे, संस्था आपल्या कर्मचार्‍यांसाठी विमान प्रवास प्रायोजित करते, ज्यांनी यापूर्वी याचा अनुभव कधीही घेतलेला नाही.

कंपनीत एक वर्ष पूर्ण केलेले कायम कर्मचारी त्यांचे नाव गुगल शीटमध्ये अपडेट करून या उपक्रमाचा लाभ घेऊ शकतात. आतापर्यंत, सुमारे ४१३ जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे आणि या वर्षी ४१ कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. सर्वात अलीकडील बॅचमध्ये १८ कर्मचारी सहभागी झाले होते. या वर्षी प्रवासाच्या ठिकाणांमध्ये मुंबई, गोवा आणि भुवनेश्वर या पर्यटन स्थळांचा समावेश आहे.

डॉ. के. एस. भुन, मनुष्यबळ प्रमुख, आरडीसी काँक्रीट, म्हणतात, "मी एका दुर्गम गावातून आलो आहे, जिथे विमानातून प्रवास करणे हे बहुतेक लोकांचे स्वप्न आहे. आर्थिक अडचणींमुळे मी माझ्या गावातील लोकांना मदत करू शकत नाही, यामुळे मला विचार करायला लावले, 'मी हे कंपनी स्तरावर का करू शकत नाही?' वरिष्ठ व्यवस्थापनाला पटवणे अवघड नव्हते, कारण त्यांचेही असेच विचार होते.”  काळात फक्त एक अडचण होती बजेटची, जी आता अस्तित्वात नाही."

भुन २०१६ मध्ये आरडीसी काँक्रीटमध्ये सामील झाले. कंपनी बांधकाम क्षेत्रात असल्याने, त्यांच्या लक्षात आले की बहुतेक ब्लू-कॉलर कामगारांनी अद्याप विमान प्रवासाचा अनुभव घेतला नव्हता. "मी २०१७ मध्ये या उपक्रमाबद्दल विचार केला आणि त्यावर व्यवस्थापनासोबत अंतर्गत चर्चा केली. हा उपक्रम २०१८ मध्ये सुरू करण्यात आला जेव्हा कंपनीने वाजवी नफा गाठला. आम्ही हा उपक्रम यापुढेही सतत चालू ठेवण्याची योजना आखत आहोत. खरंतर, 'मेरी पहली उडान' सारखे उपक्रम कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये अधिक काळ काम करत राहण्यासाठी एक प्रकारची प्रेरणा देतात. विमान प्रवासाचा अनुभव कर्मचाऱ्यांच्या कायम स्मरणात राहील, कारण तो त्यांचा अशाप्रकारचा पहिलाच अनुभव असेल. आम्ही ज्या कंत्राटी कामगारांची कमाई क्षमताही खूप कमी आहे, त्यांनादेखील ह्या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत” असे भुन म्हणाले.

'मेरी पहली उडान' हा एक दिवसाचा विमान प्रवासाचा अनुभव आहे. सकाळी ६ ते ७ च्या सुमारास प्रवासाच्या ठिकाणी जाणाऱ्या आणि रात्री ८ ते ९ च्या सुमारास परतीच्या विमानाने याची सुरुवात होते. स्थानिक सहकर्मींकडून कर्मचार्‍यांचे स्वागत केले जाते आणि ते संपूर्ण दिवस प्रेक्षणीय स्थळांवर घालवतात. याशिवाय कर्मचार्‍यांचे  अल्पोपाहार आणि जेवणही कंपनीतर्फे आयोजित केला जातो.

"आम्ही साधारणपणे एकाच स्थळी जाण्यासाठी किमान पाच कर्मचारी येण्याची वाट पाहतो. एकदा संख्या पूर्ण झाल्यावर, आम्ही उपक्रम राबवतो. उपक्रम सुनियोजितपणे पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांची गटांमध्ये विभागणी करतो. ज्यात सरासरी प्रति-कर्मचारी १०,०००/- रुपयांपर्यंत खर्च येतो." असे भुन म्हणाले.

त्यांच्या सीएसआर उपक्रमाचा एक भाग म्हणून, आरडीसी काँक्रीट त्याच्या प्रकल्पांजवळील शाळांना पायाभूत सुविधा पुरवते. काही शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालय नाही आणि अनेक वर्गखोल्या खराब स्थितीत होत्या, ज्यांचे आम्ही नूतनीकरण केले आहे. आम्ही वंचित घटकातील अनेक मुलांना देखील आधार देत आहोत ज्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, शूज, पुस्तके किंवा गणवेशदेखील उपलब्ध नाहीत.

कर्मचाऱ्यांना किमान आठ दिवस शाळेतील मुलांसोबत वेळ घालवणे आणि व्यग्र राहणे बंधनकारक आहे, ज्याचा त्यांच्या केपीआय मेट्रिक्समध्ये १० टक्के वाटा आहे. जर त्याने किंवा तिने भाग घेतला नाही तर, यामुळे त्यांच्या पदोन्नती आणि पगारवाढीवर त्याचा थेट परिणाम होईल. कथाकथन सत्र, चित्रकला स्पर्धा, मूलभूत गणित आणि इंग्रजी शिकवणी वर्गाद्वारे ते आपला सहभाग नोंदवू शकतात. त्या सत्रांची छायाचित्रं कर्मचाऱ्यांना समाज माध्यमांवर टाकावी लागतात.

आरडीसी काँक्रीटमध्ये ७५० कायम कर्मचारी आणि १,०५४ कंत्राटी कर्मचारी आहेत. कायम कर्मचार्‍यांना कंपनीच्या नफा आणि त्यांच्या कामगिरीशी निगडीत प्रोत्साहन मिळते, तर कंत्राटी कर्मचार्‍यांना दिवाळीच्या काळात एक महिन्याचा अतिरिक्त पगार दिला जातो.

एचआर विभागाने 'बेधडक बोलो' नावाचा एक उपक्रम  सुरू केला आहे, जेथे कर्मचारी विविध मुद्द्यांवर बोलू शकतात आणि सूचना देऊ शकतात. सूचना गुगल शीटमध्ये एकत्रित केल्या जातात आणि नंतर केलेल्या कृतींबद्दल कर्मचार्‍यांना सामायिक केल्या जातात.

मुलाखतीच्या शेवटी भून हे आवर्जून नमूद करतात, "जरी आयटी कंपन्यांनी अशाच प्रकारचे उपक्रम केले तरी, कदाचित बांधकाम उद्योगातील कर्मचार्‍यांच्या जीवनाला आम्ही ज्याप्रकारे स्पर्श करत आहोत त्याप्रकारे स्पर्श करत नाहीत. बहुतेक कंपन्या अगदी कंत्राटी कामगारांकडे दुर्लक्ष करतात. परंतु आम्ही त्यांना वैद्यकीयदृष्ट्या देखील सहाय्य करत आहोत आणि सर्वेक्षणांद्वारे त्यांच्या कार्य-जीवन संतुलनावर लक्ष ठेवत आहोत. आम्ही त्यांना १८ दिवसांची रजा देत आहोत, जी इतर कंपन्यांमध्ये साधारणपणे १२ दिवसांची असते,” 
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर,
मुंबई, महाराष्ट्र 
दिनांक : ०८/०९/२०२३ वेळ : २०:०३

Post a Comment

Previous Post Next Post