कविता - स्मरण


सुवर्णक्षण 
८.६.२०२३

स्मरण

तुळशी समोर
दीपक तेवतो
माऊली तुझाच
चेहरा दिसतो

गेलीस सहज
संस्कार करून
अवघे जीवन
प्रेमाने भरून

ह्रदयी जपले
ओजस्वी दातृत्व 
पवित्र उदरी
प्रगाढ मातृत्व 

प्रेमळ शब्दात
मायेचा पाझर
करुणा दयेचा
अथांग सागर

कष्टाने संसार
सुखाचा केलास
घराला अ‍ाधार
निष्ठेने दिलास

भग्नता श्वासात
आक्रोश मनात
भाबडे लेकरू
अश्रूंच्या पुरात

आजही घुमतो
आवाज घरात
कायम जपतो
तुलाच उरात

जननी तुझेच
स्मरण करतो
नश्वर देहाचा
ईश्वर मानतो

- गुरुदत्त दिनकर वाकदेकर.
मुंबई, महाराष्ट्र 
दिनांक : ०४/०६/२०२३ वेळ : १२:४१

Post a Comment

Previous Post Next Post