सुवर्णक्षण
७.६.२०२३
भारतीय संविधान
लोकशाही भारताचा
अलंकार अभिमान
सर्वधर्म समभाव
भारतीय संविधान
घटनेचा प्राणवायू
मूलभूत अधिकार
अस्मितेचा मानबिंदू
कर्तव्याचा कारभार
सामान्यांच्या जगतात
दस्तावेज एकतेचा
निरंतर समाजात
बंधुभाव जपण्याचा
सार्वभौम लोकशाही
चालवते गणराज्य
सामान्यांच्या रक्षणाचे
कल्याणाचे अधिराज्य
घटनेने कायद्याने
दुबळ्यांना आरक्षण
विषमता अत्याचार
यांपासून संरक्षण
सहकार समतेचा
सांस्कृतिक आविष्कार
भौगोलिक वैचारिक
स्वातंत्र्याचा पुरस्कार
संसदीय प्रणालीस
सांधणारी एकात्मता
लोकशाही विचाराने
संपवली अस्पृश्यता
भाग्यवंत प्रजातंत्र
कर्तव्यात रममाण
जगताचा बहुमान
ईश्वरीय वरदान
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर,
मुंबई, महाराष्ट्र.
दिनांक : ०६/०६/२०२३ वेळ : ०८:११
Post a Comment