सुवर्णक्षण
३.६.२०२३
पाऊस
मेघ जलद
नभी दाटले
ढोल अंबरी
असे वाजले
वार्या सोबत
कृष्ण मुरारी
अशी वाजवी
धुंद बासरी
रंध्री भिनावे
मृदा अत्तर
यावे अधरी
गाणे सुंदर
शीत होऊनी
काया शमली
गर्द शालूत
सृष्टी सजली
नभी लकाके
वीज दिवानी
छबी टिपते
जणू साजणी
सात रंगांचे
चित्र मोहक
रंग उधळे
शुभ्र उदक
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर,
मुंबई, महाराष्ट्र.
दिनांक : ०२/०६/२०२३ वेळ : ११:५९
Post a Comment