सुवर्णक्षण
२८.६.२०२३
सदा लढत रहावे
लख्ख उजेडात मज
भीती नाही अंधाराची
गाज अर्णवाची छेडे
तान गहिऱ्या स्वराची
सदा लढत रहावे
शिकवण जीवनाची
माज नको जिंकण्याचा
लाज नको हरण्याची
ध्येय गाठता येईल
हास निर्मळ बघून
मार्ग सापडेल नवा
बघ आयुष्य जगून
कधी होत्या जिथे ज्वाळा
राखेखाली तिथे धग
घेऊ गगनी भरारी
पुन्हा चेतवूनी आग
मन निर्भय करून
स्वीकारावी मोक्ष वाट
असे जीवन जगावे
ठरावी प्रकाशवाट
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर.
मुंबई, महाराष्ट्र.
दिनांक : १७/०६/२०२३ वेळ : ०५:१७
Post a Comment