सुवर्णक्षण
१९.५.२०२३
पाळणा
'श्रुती' घरी आली परी
हसू तिच्या दिठी खुले
माऊलीचा स्पर्श होता
गोड 'संकेत' तू दिले
मज पाहूनी हासता
मुके पटापट घेते
तव पैंजणांचा नाद
भान हरपून नेते
घालू झबले टोपडे
लावू काजळ टिकली
कोल्हापूरी पाळण्यात
माझी छकुली सजली
आई जोजवता बाळा
कळी खुदकन हसे
चांदण्यांच्या अंगणात
माझी परीराणी वसे
तुझ्यासाठी आले सारे
चंद्र तारे आकाशीचे
चल खेळूया साजणे
खेळ तुझ्या आवडीचे
सखे 'शीतल' 'अश्विनी'
'बाळकृष्ण' सुद्धा आले
'नारायण' 'सरस्वती'
छान पाळणा गायले
स्वप्नं 'स्नेहल' सौख्याची
बघ आईंच्या कुशीत
इवल्याशा बोटांमध्ये
धर हलकेच हात
झुला गोड गोजिरीचा
'ओमकार' झुलवूया
चला 'सुशीला' 'सुनंदा'
अलवार निजवूया
'अरविंद' गाई गीत
साथी 'अद्वित' 'श्रीयोग'
शुभ मुहूर्त घटिका
तुझ्या स्वागताचा योग
माय थकली कितीही
तरी जागते नयनी
तझ्या स्वप्नांतला गाव
तिच्या साकारे लोचनी
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर.
मुंबई, महाराष्ट्र
दिनांक : १९ मे, २०२३ वेळ : १०:५७
Post a Comment