सुवर्णक्षण
१६.५.२०२३
रेशीमगाठ
लग्न पवित्र सोहळा
मांगल्याचा अनुभव
आयुष्याच्या आठवांचा
एक आगळा साकव
माय जपते सावली
पाहुण्यांच्या गराड्यात
नाळेसवे सारे क्षण
साठवले ह्रदयात
तात होईल आतूर
ऐकण्यास तुझा स्वर
होता सार्या घरभर
तुझा अल्लड वावर
'प्राजक्ता'ची तू सावली
नृत्यांगणा तू 'प्रवीण'
कशी नात्यात गुंफली
प्रेमभावे घट्ट वीण
'ओमकार' 'चैत्राली'चा
असा सजावा संसार
दोन्ही कुटुंबांचा बंध
व्हावा रेशमी आधार
लग्नाची रेशीमगाठ
दोन कुटुंबाची नाळ
सौभाग्याचा खरा साज
काळ्या मण्यांची ही माळ
आशीर्वाद देण्यासाठी
परिवार सारा आला
अक्षतांच्या सोबतीने
घोष तथास्तूचा झाला
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर.
मुंबई, महाराष्ट्र.
दिनांक : १६/०५/२०२३ वेळ ०४:४१
Post a Comment