युगंधरा मराठी साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर.
अष्टाक्षरी काव्यस्पर्धा
स्पर्धेचा कालावधी : २१ व २२ डिसेंबर २०२५, वेळ सकाळी ६ ते रात्री १०
════◄••❀••►════
विषय : पदर
काव्यप्रकार : अष्टाक्षरी
शीर्षक : अभिमान
जपे सुंदर ओढणी
सांगे संयम संस्कार,
मौन उलगडे भाव
स्पंदनांचा हळुवार.
दिसे कोमल विश्वास
डोळ्यांतली संवेदना,
संयमाच्या पावलांनी
घडे जीवन साधना.
संस्कृतीच्या सावलीत
दीप अस्तित्व उजळे,
त्यागातून अलवार
मूक भावनाच कळे.
काळ संघर्ष वाहती
देती स्वप्नांना वाट,
गाठ कर्तव्य बांधुनी
सुख शोधे जीवनात.
अभिमान जपणारी
संस्कारांची एक धार,
तोच मानाचा पदर
ठरे ओळख संसार.
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २२/१२/२०२५ वेळ : १३:०५
Post a Comment