तितिक्षा महाकाव्य लेखन करंडक स्पर्धा २०२५
तितिक्षा भावार्थ सेवा संस्था अंतर्गत", "तितिक्षा इंटरनॅशनल पुणे" व "सोल्युशन माईंड" आणि "भारतीय विचारधारा"" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तितिक्षा महाकाव्य लेखन करंडक स्पर्धा २०२५ स्पर्धेसाठी
फेरी क्रमांक : ४
विषय : लोकमान्य
शीर्षक : क्रांतीची मशाल
जनतेच्या हक्कांची मशाल पेटवली,
शब्दांनी क्रांतीची दिशा ठरवली,
गजाआड गेले तरी झुकले ना मस्तक,
लोकमान्य म्हणून अमरता मिळवली!
केसरी पत्रातून ज्वाला चेतवली,
जुलमी इंग्रजांची छाती भेदली,
स्वातंत्र्याचा मंत्र सर्वत्र घुमला,
जागृतीची बीजे मनात रुजवली!
अवघा भारत त्यांची गाथा गातो,
त्याग, पराक्रमांची कथा सांगतो,
पुस्तकात नाहीत, ते सदैव हृदयात,
विचारांचे दीप आज पुन्हा पेटवतो!
नवचैतन्यांची लाट अंतर्मनात येती,
केसरीचे शब्द, विचार दीपवती,
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क” —
लोकमान्यांची प्रेरणा स्वप्न फुलवती!
दिवस हा त्यांच्या गौरवाला अर्पण,
श्रद्धेने करूया सारे प्रेमपूर्ण नमन,
कवी हृदयातून उद्गार फुटती,
अजरामर लोकमान्यांना शब्दांनी वंदन!
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०१/०८/२०२५ वेळ : ०५:१३
Post a Comment