तितिक्षा महाकाव्य लेखन करंडक स्पर्धा २०२५
तितिक्षा भावार्थ सेवा संस्था अंतर्गत", "तितिक्षा इंटरनॅशनल पुणे" व "सोल्युशन माईंड" आणि "भारतीय विचारधारा"" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तितिक्षा महाकाव्य लेखन करंडक स्पर्धा २०२५ स्पर्धेसाठी
फेरी क्रमांक : २
विषय : अण्णाभाऊ साठे
शीर्षक : अण्णाभाऊ – जनतेचा आवाज
‘फकिरा’ होतो रणधुरंधर,
चिरशोषणाशी झुंजणारा।
‘माकडीचा माळ’ उलगडतो,
अंधारात दीप उजळवणारा॥
‘जिवंत काडतूस’ बनतो शब्द,
क्रांतीचा निखारा पेटतो।
ज्वालामुखीसम काव्यातून,
वेदनांचा अंगार उठतो॥
तुटक्या चपलेतून चालले,
स्वप्न भेगाळलेल्या मातीत।
झोपडीत लागतो वणवा,
विवेकाचा दीप मनात॥
‘कृष्णाकाठच्या कथा’ फिरती,
जातीभेदांच्या रेषा खोडती॥
‘इनामदार’ बुरखा फाडती,
न्यायाचं नव रोप रुजवती॥
वारस आम्ही त्या तेजाचा,
जिथे फावडा मंत्र बनतो।
लेखणीसवे उजळते मशाल,
अण्णांचा हुंकार धगधगतो॥
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १८/०७/२०२५ वेळ : २१:०१
मूळ कविता खालीलप्रमाणे:
शीर्षक : अण्णाभाऊ – जनतेचा आवाज
माळावरून उठती वाटा,
पायांशी बोचते दरिद्रता।
जिभेवर शोषितांचे हुंकार,
ओठांवर धगधगते अस्मिता॥
‘फकिरा’ होतो रणधुरंधर,
चिरशोषणाशी झुंजणारा।
‘माकडीचा माळ’ उलगडतो,
अंधारात दीप उजळवणारा॥
‘वारणेचा वाघ’ गर्जतो,
अन्यायावर झडप घालतो।
‘चिखलातील कमळ’ खुलते,
श्रमगंधाने श्वास दरवळतो॥
‘गजाआड’, ‘पुढारी मिळाला’,
लोकशाहीची होते हानी।
‘लोकमंत्र्यांचा दौरा’ सागे,
पिळवणुकीची नवी कहाणी॥
‘आवडी’तून उमलती संकल्प,
स्त्रीत्वाचा जागवणारा गंध।
‘डोंगरची मैना’ सांगते,
सत्व अन् संघर्षाचा बंध॥
‘बेकायदेशीर’ ठरतो आवाज,
जिथे आशाही कैद असते।
‘देशभक्त घोटाळे’ भेदतो,
जिथे नीतीही हताश दिसते॥
‘जिवंत काडतूस’ बनतो शब्द,
क्रांतीचा निखारा पेटतो।
ज्वालामुखीसम काव्यातून,
वेदनांचा अंगार उठतो॥
‘कृष्णाकाठच्या कथा’ फिरती,
जातीभेदांच्या रेषा खोडती॥
‘इनामदार’ बुरखा फाडती,
न्यायाचं नव रोप रुजवती॥
कळस म्हणजे ‘मूक मिरवणूक’,
शांततेतील वीज बनते।
‘माझी मुंबई’ सांगून जाते,
संघर्षात सत्य फुलते॥
तुटक्या चपलेतून चालले,
स्वप्न भेगाळलेल्या मातीत।
झोपडीत लागतो वणवा,
विवेकाचा दीप मनात॥
वारस आम्ही त्या तेजाचा,
जिथे फावडा मंत्र बनतो।
लेखणीसवे उजळते मशाल,
अण्णांचा हुंकार धगधगतो॥
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १८/०७/२०२५ वेळ : २१:०१
Post a Comment