स्पर्धेसाठी
शब्दसेतू साहित्य मंच, पुणे
आणि
मोरणा कवीकट्टा समूह, पश्चिम महाराष्ट्र
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
पश्चिम महाराष्ट्र काव्य करंडक काव्यलेखन स्पर्धा २०२५
फेरी क्रमांक : १
विषय : मायभूमी
शीर्षक : मातृभूमी
मातृभूमीची माया अमोल,
रूजवते सत्त्वाचं बीज।
तीच शक्ती, तीच जीवनधारा,
श्वासास दिले ममतेचे तीज।।१।।
सह्यगिरी अंगी तिचा डौल,
गंगा-यमुनेची वाहती प्रीत।
प्रिय तिला श्रमवीरांचा घाम,
धारांमधूनी झरते गीत।।२।।
हुतात्म्यांच्या रक्तात न्हाली,
राखते आजही त्यांची शपथ।
जिथे स्वातंत्र्य नांदते असते,
विझत नसते शौर्याची ज्योत।।३।।
शत्रू येईल जर सीमारेषेवर,
हृदयात पेटून उठते आग।
लढू प्राणाने, झुंजू निर्धाराने,
मायभूसाठी करू देहत्याग।।४।।
भारतभूचा झेंडा उंचावा,
गगनात गाजो तिचा मान।
जननी मातृभूमी स्वर्गाहून,
आमुचा चिरंतन अभिमान।।५।।
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : २५/०५/२०२५ वेळ : २२:५१
Post a Comment