भान
महाराष्ट्र दिनानिमित्त
चला शूरवीरांना स्मरू
रक्त सांडले ज्या वीरांनी
त्यांना कोटी वंदन करू
कुंकुमतिलक करून
भाळ आनंदाने सजवू
नभी भगवा डौलताना
शिर अलवार झुकवू
रायगडाच्या पायथ्याची
सांगू महती जगतास
लवून मुजरा करूया
छत्रपती महाराजांस
शौर्य अन् पराक्रमांनी
दिल्लीचेही तख्त राखले
इतिहासाच्या पानोपानी
मिळती कित्येक दाखले
कृष्णा, गाजर, रणभीर,
मोती, विश्वास, इंद्रायणी
महाराजांची अश्वशक्ती
सदैव राहिली इमानी
तेच भान मनी बाळगू
गाऊ महाराष्ट्राचे गीत
शंख नगारे सनईचे
आसमंती गुंजो संगीत
©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : ०१/०५/२०२४ वेळ : ०४०५
Post a Comment