बागेत उडणाऱ्या
फुलपाखराच्या मनात
एक प्रश्न निर्माण झाला
हा गुलाबाचा सुगंध,
तो चंपा आणि चमेलीचा,
कोणत्या सुगंधाने
अवघा आसमंत दरवळे?
दरम्यान,
बागेतून हवा जात असताना,
प्रत्येक विचार बाजूला सारून,
सर्व सुगंध आपल्या कवेत गोळा करते
आणि बागेचा मिश्र परिमळ
दूरवर असलेल्या निवडुंगाला
सुगंधित करून जाते.
©गुरुदत्त रोहिणी दिनकर वाकदेकर, मुंबई
दिनांक : १६/०३/२०२४ वेळ १८३९
Post a Comment