कविता - नारायण मिल गल्ली


नारायण मिल गल्ली


नारायण मिल गल्ली 

गिरणगावची शान

कला साहित्य संस्कृती 

यांचे जपे नित्य भान


मुंबईच्या गल्ल्यांमध्ये

होत आहेत उत्सव

सान थोरांच्या मुखात

इथलाच दीपोत्सव 


इकडच्या गल्ल्यांमध्ये

रमणीय दृश्यावली

पणत्यांच्या उजेडाने

घरंदारं उजळली


गल्लीमध्ये करतात

रोशनाई सतरंगी

दीपोत्सव करण्याची

परंपरा बहुढंगी


सामाजिक बांधिलकी 

जपे सुगंध शब्दांचा

प्रत्येकाला भेटताना

प्रेमभाव बंधुत्वाचा 


कष्टकरी गल्लीतला

लावी सर्वांनाच लळा

ऐक्य आनंद सामर्थ्य 

‍असा आगळा सोहळा


©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई

दिनांक : ०२/११/२०२४ वेळ : १७:४६

Post a Comment

Previous Post Next Post