कविता - माझ्यासाठी हेच पसायदान

 


माझ्यासाठी हेच पसायदान

विधात्याचं निर्मळ दान
आयुष्याचं सुंदर पान
माझं काळीज की प्राण
नात्याची अनोखी शान

जतन करू कसे हे चंदन
श्वासांच्या माळेचे इंधन
मुख पाहता धन्य जीवन
तिच्याविना दिस वाटे मरण

साभिमानी मी पुण्यवान
पैसा नसूनही धनवान
बाप असण्याचा बहुमान
कसे करू सांगा कन्यादान

कोणाशी नसे मूल्यमापन
ना करी कधी सिमोल्लंघन
सांगतो जगास भरभरून
माझ्यासाठी हेच पसायदान

*©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई*
दिनांक : ०१/०९/२०२४ वेळ : २३:५३


Post a Comment

Previous Post Next Post