सुवर्णक्षण
९.६.२०२३
तूच आई हवी
मजला लाभला । जाहलो मी धन्य ।
स्पर्श बहु पुण्य । उदराचा ॥१॥
कृपा केली माते । दिलेस तू श्वास।
दिलास विश्वास | जगण्याचा ॥२॥
भुंगा करी दंगा । मधा लागे माशी ।
जीव तुझ्यापाशी । लेकराचा ॥३॥
मलाही लाभला । वसा अभंगाचा ।
संगही संतांचा | संस्कारांचा ॥४॥
माझिया विश्वाचा । तूच पांडुरंग ।
अवघा श्रीरंग। कैवल्याचा ॥५॥
भक्ता पुंडलीका । मज नाही आस ।
तूच खरा दास | पंढरीचा ॥६॥
तूच आई हवी । सांगतो माधवा ।
गुरु करी धावा । मातृत्वाचा ॥७॥
- गुरुदत्त दिनकर वाकदेकर,
मुंबई, महाराष्ट्र.
दिनांक : ०८/०६/२०२३ वेळ : १८:११
Post a Comment